
मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील चार मतदारसंघात एकूण 5 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आजअखेर पहिल्या टप्प्यातील सात मतदार संघांपैकी 5 मतदार संघात एकूण 11 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
पहिल्या टप्प्यात दि. 18 मार्चपासून 7 लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली. आज 8- वर्धा लोकसभा मतदार संघात 1, 10- नागपूर मतदार संघात 1, 13- चंद्रपूर मतदार संघात 1 आणि 14- यवतमाळ- वाशीम मतदार संघात 2 उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली.
आज दि. 20 मार्चअखेर पहिल्या टप्प्यात 8- वर्धा लोकसभा मतदार संघात 1, 10- नागपूर मतदार संघात 3, 11-भंडारा-गोंदिया मतदार संघात 2, 13- चंद्रपूर मतदार संघात 1 आणि 14- यवतमाळ- वाशीम मतदार संघात 4 अशी 11 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.















