मुंबई: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ करिता नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील ६ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ९३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. आजपर्यंत १५६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून आज १२ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २२ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आज १८ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) लोकसभा मतदारसंघातून आज २३ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण ३३ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. तसेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून आज १४ उमेदवारांनी, तर आजपर्यंत एकूण २७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांची अर्ज भरले. तर आजपर्यंत ३०उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आज ८ उमेदवारांनी तर आतापर्यंत १७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी १० एप्रिल २०१९ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याच्या प्रसिद्धी माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे
लोकसभा निवडणूक २०१९
– मुंबईमधून एकूण १५६ उमेदवारी अर्ज दाखल
– आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ९३ अर्ज दाखल
– मुंबईमधून एकूण १५६ उमेदवारी अर्ज दाखल
– आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ९३ अर्ज दाखल
– शहर जिल्ह्यातून एकूण ३७ अर्ज
– दक्षिण १७
– दक्षिण मध्य २०
– दक्षिण १७
– दक्षिण मध्य २०
– उपनगर जिल्ह्यातून एकूण १०९ अर्ज
– उत्तर २२
– उत्तर पश्चिम २७
– उत्तर पूर्व ३३
– उत्तर मध्य २७
– उत्तर २२
– उत्तर पश्चिम २७
– उत्तर पूर्व ३३
– उत्तर मध्य २७















