नवी दिल्ली : 2025 सालापर्यंत लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वार्षिक गुंतवणूक 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. यामुळे देशात लाखो रोजगार निर्माण होतील आणि भारताच्या अंतर्गत आणि जागतिक व्यापारात येणाऱ्या बाधा दूर होतील.
अनेक परदेशी कंपन्या भारताकडे निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून पाहत आहे. तसेच मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडियासारख्या उपक्रमांनी कुशल मनुष्यबळासह किफायतशीर व्यवस्थेला प्रोत्साहन दिले आहे.
अलिकडच्या काळात केंद्र सरकारने कार्यक्षम लॉजिस्टिक्स सेवांच्या माध्यमातून व्यापाराला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यात सीमा तसेच सीमापार क्षेत्रात व्यापारी घडामोडींचे दस्तावेज तयार करणे, समर्पित मालवाहतूक मार्गिका, बंदर आणि अन्य पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक आदींचा समावेश आहे. लॉजिस्टिक्सचा प्रभावी व्यवस्थापनाचा निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील एकूणच व्यापारावर सकारात्मक परिणाम होतील. मंत्रालय राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणावर काम करत आहे. मल्टिमोडल लॉजिस्टिक्स पार्कसाठी देखील लवकरच धोरण जाहीर केले जाईल.
यावेळी प्रभू यांनी लॉजिस्टिक्स विभागाच्या लोगोचे प्रकाशन केले.