मुंबई : पॅच चिकटवून लपवलेल्या टकलाचे गुपित उघड होण्याची भीती अनेकांना सतावू लागली आहे. एकदा का पॅच लावला की दर महिन्याला विशिष्ट सलूनमध्ये त्याची सेंटिंग करावी लागते. पॅच हलणार नाही याची काळजी घ्यावी लागते. लॉक डाऊनमुळे सलून्स बंद आहेत. आता तर लॉक डाऊनमध्ये वाढ झाल्याने टक्कल लपवणार्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
टक्कल पडणे ही समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी हेअर विगचा वापर केला जातो. डोक्याच्या ज्या भागावर टक्कल पडले त्या भागावर विशिष्ट गमपट्टीच्या सहाय्याने हेयर पॅच चिकटवला जातो. यामुळे समोरील व्यक्तीचे केस खरेच आहेत, असे वाटू लागते.
एकदा का हेयर पॅच चिकटवला की 30 दिवसांच्या आत डागडुजी करावी लागते. लॉक डाऊन आणि त्याआधी राज्यातील आचारसंहिता यामुळे एक महिना होत आला आहे. तेव्हा पॅचला लावण्यात आलेली गम पट्टी आता कधीही सैल होऊन निघू शकते आणि टक्कल दिसू शकते.
“ माझेही पॅच सैल झाले होते. मी गमपट्टी आणून ठेवली होती. घरीच पॅच काढला. टकलावरील थोडे केस काढण्यासाठी रेझरचा वापर केला. गम पट्टीचा वापर करून कसाबसा पॅच चिकटवला. दीड तास गेला. खूप मोठी प्रकिया केल्यासारखे वाटले. केस धुवावे लागतात, असे एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर संगितले. कधी एकदा लॉक डाऊन संपते, असे झाल्याचेही त्याने सांगितले.
“अनेकांचे पॅच सेल होत चालले आहेत.लॉकडाऊनच्या काळात मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही,” असे एका हेयर पॅच बसविणार्या एका सलून मालकाने सांगितले.