बंगलोर : भारतातील सर्वांत मोठ्या ई कॉमर्स ऑथेंटिकेशन प्रक्रिया कंपनी असलेल्या विम्बो इन्क. ने कार्ड व्यवहारांविषयी काढलेल्या निष्कर्षांची घोषणा केली.
२२ मार्च रोजी म्हणजेच जनता कर्फ्युच्या दिवशी ऑनलाईन शॉपिंग मध्ये तब्बल ३० टक्क्यांची घसरण झाली. त्यानंतरच्या आठवड्यात भारतीय ग्राहकांनी पुन्हा ऑनलाईन खरेदीवर भर दिला पण तरीही यावर परिणाम दिसून आला.
रूपे च्या व्यवहारात हळू हळू वाढ होतांना दिसली. तरीही व्यवहार ९८ टक्के झाले, पण सातत्याने येणारी अनिश्चितता आणि बचावात्मक पवित्र्यामुळे ही आकडेवारी ८७ टक्के ते ९८ टक्के यांमध्ये राहीली.
दुसरीकडे विजा आणि मास्टरकार्डावरील खरेदी ने उसळी घेऊन साधारण खरेदीच्या ८६ टक्क्यांपर्यंत मजल मारली व तरीही ही आकडेवारी ७०-८६ टक्क्यांच्या दरम्यान राहिली. ही सर्व आकडेवारी ही लोकांनी त्यांच्या आवडीने केलेल्या खरेदी मुळे असू शकेल.
जसजसा आठवडा जाऊ लागला, रूपे च्या खरेदी मध्ये विजा आणि मास्टरकार्डच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक वाढ झाल्याचे दिसून आले. याच कालावधीत ग्राहकांनी गरजांना प्राधान्य दिल्याने सरासरी खर्चात २५ टक्क्यांची घट होतांना दिसली.
“आम्ही दरवर्षी २.२ बिलियन हून अधिक व्यवहार करत असतो त्यामुळे आंम्हाला ग्राहकांचा व्यवहार आणि खर्चाच्या पध्दतींचा निष्कर्ष काढता येतो. अशा कठीण काळात ग्राहकांना घरी रहावे लागत असल्याने ते ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देणे सहाजिकच होते.” असे कंपनीचे सीईओ गोविंद सेतलुर यांनी सांगितले. “ इतिहासातील हा टप्पा महत्त्वपूर्ण आहे कारण ग्राहक आता सोपेपणाला प्राधान्य देऊन नवनवीन उत्पादने आणि सेवांना ऑनलाईन प्राधान्य देतांना दिसतात. विम्बो मध्ये आम्ही नेहमी प्रमाणेच कार्यरत आहोत कारण आमच्या सेवा ग्राहकांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.” ते पुढे म्हणाले.
खर्चाची पध्दत समजून घेतांना
खालील आकृतीच्या माध्यमातून आपण ग्राहकांच्या खर्च करण्याच्या पध्दतीतील बदल समजून घेऊ शकतो. ग्राहकांपैकी ७० टक्के लोकांनी ऑनलाईन बिल पेमेंट्सचा मार्ग निवडला आहे. एकूणातील ऑनलाईन खरेदीत १६ टक्क्यांची घट झाली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे यात्रांसारखी क्षेत्रे पूर्णत: बंद आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन बिल पेमेंट्स मध्ये वाढ झाली तर खाद्य आणि पेय डिलिव्हरी ॲप्स ना आणि वित्तीय सेवांना याचा मोठा फटका बसला आहे. गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रात स्थिरता दिसून आली. ऑनलाईन शॉपिंग करत असतांना किराणा आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणावर स्थैर्य दिसून आले.