
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी मिशन ब्रेक द चेन या नावाने गेल्या १ जुलैपासून आठ दिवसांसाठी कडक लॉकडाउन सुरू करण्यात आला होता. आज त्याची मुदत संपल्याने पुढे काय होणार, याबाबत उत्सुकता होती. ती आता संपली आहे. लॉकडाउन येत्या १५ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. या कालावधीत पूर्वी लागू असलेले निर्बंधच 15 जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.