मुंबई : खोपोलीहुन मुंबईकडे येणाऱ्या जलद गाडीच्या मालडब्यामध्ये अचानक विक्रोळी आणि घाटकोपर या रेल्वे स्थानकांदरम्यान आग लागली. आज रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहिती नुसार डब्याच्या आत अचानक आग लागली. सजग प्रवाशांनी गाडी थांबवून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर गाडी रिकामी करून कारशेडकडे रवाना करण्यात आली. या प्रकारामुळे काही वेळ गाड्यांचे वेळा पत्रक बिघडले होते. रात्री नऊ नंतर वेळापत्रक रुळावर आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.