
अभिनेते, लेखक, निर्माते म्हणून दिवंगत लिलाधर शंकर पिळणकर संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचे आहेत. सप्टेंबर महिन्यातील त्यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त घेऊन शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक काम करणार्या ‘कलाश्रम’ या संस्थेच्यावतीने ‘मिमिक्री’ अर्थात नकला आणि स्टॅण्डअप कॉमेडी या स्पर्धेचे 21 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आयोजन केलेले आहे. स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्राच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जाणार आहे. पिळणकर यांची स्वत:ची ‘पिळणकर आणि पार्टी’ अस्तीत्वात होती. हास्याचे कार्यक्रम करुन निव्वळ मनोरंजन करणे हा पिळणकर बंधूंचा मुख्य हेतु होता. त्यांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथम येणार्या तीस स्पर्धकांना यात प्राधान्य दिले जाईल. रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि पुस्तक भेट असे यातील बक्षिसाचे स्वरुप आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन यांना कलाश्रमच्या ‘१९ व्या अभियान सन्मान सोहळ्या’त नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरित केले जाणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून स्पर्धकाला सात मिनिटांत आपली कला सादर करायची आहे. सर्व वयोगटातील स्पर्धकांना यात सहभागी होता येईल. शनिवार २१ सप्टेंबर २०१९ या दिवशी दुपारी २.३० वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, चौथा मजला इथल्या भरतनाट्यम् या सभागृहात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. २० सप्टेंबरपूर्वी नावाची नोंद करणे आवश्यक आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सुवर्णा गुराम- ९८६९००८८०५ / ८८२८२१८८०५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कलाश्रमच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी केलेले आहे.














