रत्नागिरी (आरकेजी) : रत्नागिरी जिल्ह्यात लेप्टोचे प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येत ही वाढ झाली आहे. वर्षभरात लेप्टोचे १८ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पावसाळ्यात साथींच्या आजार डोके वर काढतात. डेंग्यू, मलेरिया, लेफ्टो आदी आजार होतात. त्यात उंदराच्या विष्ठेमुळे लेप्टोची बाधा होते. पावसात त्याचा अधिक प्रसार होतो. काही रुग्णांच्या पायाला झालेल्या जखमा किंवा अन्य माध्यमातून विष्ठेतील विषाणू माणसाच्या शरीरात जातो. जिल्ह्यात जानेवारीपासून लेप्टोचे ८६ संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापैकी १८ रुग्णांना लेप्टोची लागण झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. संगमेश्वर तालुक्यात लेप्टोचा सर्वाधिक फैलाव झाला आहे. येथे ४० संशयितांपैकी १० जणांना लेप्टोची लागण झाली आहे. तर रत्नागिरी तालुक्यात १४ संशयितांपैकी ६ जणांना लेप्टोची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनात आले आहे. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाने लेप्टोवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने कोणताही रुग्ण दगावलेला नाही.