
मृत बिबट्या
रत्नागिरी : रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना चिपळूण-कराड महामार्गावर घडली. आज पहाटे पोफळी सय्यदवाडी येथे हा अपघात घडला. मृत बिबट्या हा मादी जातीचा आहे. त्याचे वय चार वर्षे होते.
बिबट्या रस्ता ओलांडत होता. याचवेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. ही धडक इतकी वेगात होती की बिबट्याच्या मणक्याला मार लागला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.