रत्नागिरी : राजापूर तालुक्यामध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. तालुक्यातील आडवली-फुफेरे रोडवर हा बिबट्या सापडला. गावातील दिलीप जाधव यांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसल्यांनतर त्यांनी वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी घटनास्थळी येऊन बिबट्याची पाहणी केली. वाहनाच्या धडकेनं या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. बिबट्या मादी असून साडेतीन ते चार वर्षाचा आहे.