
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : आरे वसाहतीत कुटूंबासह फिरण्यासाठी आलेल्या अडीच वर्षाच्या बालकाच्या बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला.
विहान गुरुडा असे त्या बालकाचे नाव आहे. आज शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कुटुंबासोबत फिरत असताना बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
फ़िल्म सिटीमधील सुरक्षा रक्षक कमलाकर माळी याचे नातेवाइक तेथील हेलीपॆडवर फिरण्यासाठी आले होते. याचवेळी ही घटना घडली. बिबट्याने हल्ला केल्यानंतर जखमी विहानला तत्काळ जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान नऊ वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ट्रामा रुग्णालयाचे अधीष्ठाता शशिकांत वाडेकर यांनी दिली.