रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे गुरुवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. कुर्धे बस थांब्याजवळ दुचाकीवर उभ्या असलेल्या संतोष राजाराम मयेकर .रा.गावडेआंबेरे, गुरववाडी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्याच स्थितीत त्यांनी दुचाकी सुरु केली. तरिही बिबट्याने गाडीचा पाठलाग केला. अखेर गाडीच्या वेग वाढविल्यानंतर बिबट्या मागे फिरला. जखमी झालेल्या मयेकर यांना नातेवाईकांनी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनतर ते कुर्धे येथे घटनास्थळी आपल्या सहकार्यासह रवाना झाले.
कुर्धे गावात गेले काही महिने बिबट्याचा वावर सुरु आहे. गणेशगुळे, कुर्धे या भागात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. दोन महिन्यापुर्वी पहाटे एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये ती महिला जखमी झाली होती.