मालाड, (निसार अली) : मालाड पश्चिमेतील मनोरी, मार्वे, आकसा, दाना पानी,एरंगळ, भाटी, मढ, सिल्वर या मार्वे ते मढ बेटावरील समुद्र किनारे एलईडी दिव्यांच्या लखलखाटाने उजळले आहेत. गुरुवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता मालाड पश्चिम चे आमदार अस्लम शेख यांच्या हस्ते 178 एलईडी दिव्यांचे उदघाटन करण्यात आले.
समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण व विकासासाठी आमदार शेख यांनी वेळो वेळी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. एलईडी दिवे लागल्याने समुद्र किनाऱ्यांचा रुपडे पालटले आहे. तसेच यामुळे देशी-विदेशी पर्यटक निर्धास्तपणे पर्यटनाचा आनंद घेतील.
नगरसेविका स्टेफी किणी, नगरसेवक वीरेंद्र चौधरी, ऎड. विक्रम कपूर तसेच मार्वे व मढ गावाचे कोळी बांधव आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.