रत्नागिरी, प्रतिनिधी : एलईडीद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना देखील नौकेवर एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या गुहागर येथील नौकेसह नौका मालकावर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे . कारवाई करताना नौकेवरील एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे . मत्स्य विभागाच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली . नौकेवर एलईडी लाईट बसवुन मासेमारी करण्यास बंदी आहे . मंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच नौकांवर कारवाईचे आदेश देखील दिले होते . यानुसार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली . सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी , जयगड श्रीम . स्मितल कांबळे तसेच सुरक्षा रक्षक श्री . परिमल परशुराम मळेकर व श्री . सर्वेश प्रभाकर आडविरकर यांनी ही कारवाई केली . साखरीआगार ता . गुहागर जि . रत्नागिरी येथील निलेश दगडु पाटील यांच्या मासेमार नौका कृपा आई स्वामी या नौकेवर एलईडीचे साहित्य आढळून आले . या प्रकरणी सदर नौका मालकावर म . सा . मा.नि. अधि . १ ९ ८१ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे . नौकेवरील एल.ई.डी लाईट्स चे साहीत्य जप्त केले असून मा . अभिनिर्णय अधिकारी , रत्नागिरी यांच्या कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत नौका जयगड बंदरात अवरुद्ध करुन ठेवण्यात आली आहे