
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरणाला गळती लागली असून, सध्या या धरणातील पाणीसाठी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.
तिवरे धरण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धरणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. दापोली तालुक्यातील खेम धरण आणि चिपळूण तालुक्यातील मोरवणे धरण यांचीही स्थिति अशीच आहे. मोरवणे धरण सध्या 100 टक्के भरलं असून, या धरणालाही गेली काही वर्ष गळती लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही रविवारी या धरणाची पाहणी केली.
या धरणाची पाणीक्षमता 3.84 दशलघमी एवढी आहे. सध्या हे धरण पूर्ण भरलं आहे. दरम्यान दक्षता म्हणून या धरणातून पाणी साठा कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश पाटील यांनी ही माहिती दिली.















