लातूर : तेल फॅक्टरीमधील टाकी साफ करण्यासाठी उतरलेले ९ कामगार गुदमरून ठार झाल्याची घटना लातूर एमआयडीसीमध्ये घडली. सोमवारी सात कामगार मरण पावले होते. आज मध्यरात्री आणखी दोन कामगारांचे मृतदेह अग्नीशमन दलाने ताब्यात घेतले. टाकीत विषारी वायू साचला होता. किर्ती ऑइल मिल्स या कारखान्यात हा प्रकार घडला.
राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली आणि चौकशीचे आदेश दिले.
शेवटचा मृतदेह मिळाल्यावर मध्यरात्री तीन वाजता अग्नीशमन दलाने मोहीम थांबविली. सोमवारी टाकी साफ करत असताना त्यात साचलेल्या विषारी वायूने काही कामगार गुदमरले. या नंतर काहीजण टाकीची तपासणी करण्यासाठी उतरले, परंतु ते बाहेर येऊ शकले नाहीत.
त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश मिळाले. “ हा कामगार बेशुद्धावस्थेतत होता. त्याच्यावर लातूरमधील विवेकानंद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.” असे अग्नीशमन दलाच्या अधिकार्यांनी सांगितले.
याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.