रत्नागिरी : लांजा तालुक्यात शिवसेनेला खिंडार पाडण्यात भाजपाला यश आले. तालुक्यातील भांबेड येथील उपशाखाप्रमुख विलास चव्हाण यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लांजा तालुक्यातील पूर्व विभागात विलास चव्हाण याचा दांडगा जनसंपर्क आहे. यांच्या भाजप प्रवेशामुळे लांजा पक्षाला बळकटी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केला, असे चव्हाण म्हणाले.