रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं लांजा राजापूर विधानसभा मतदार संघात मोफत वाटप केेलं जााणार आहे. यासाठी लांज्यामधील सुपुत्र आणि नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड यांनी पुढाकार घेतला आहे. या मतदार संघातील घरांमध्ये या गोळ्यांचे मोफत वाटप होणार आहे. नवी मुंबईतून या गोळ्या राजापूरमध्ये पाठवण्यात आल्या असल्याची माहिती अविनाश लाड यांनी दिली आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या या गोळ्याचं वाटप राजापूर मतदारसंघात उद्यापासून सुरु होणार आहे.