रत्नागिरी, (आरकेेेजी) : लांजा पोलीस स्थानक हायटेक बनले आहे. या पोलीस स्टेशनला नुकतेच आय. एस. ओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. पोलिस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आपल्या कारभारात सुधारणा केल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्थानके आय. एस.ओ मानांकित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी आप आपली स्थानके आय. एस. ओ. मानांकित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यानुसार लांजा स्थानकातील जुनी व्यवस्थात मोडीत काढून नवी कार्यप्रणाली स्विकारली आहे. यामध्ये अधिकार्याची बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, अग्नीरोधक यंञ, ठिक ठिकाणी सुचना फलक, प्राथमिक उपचार पेटी, तक्रार पेट्या ठेवल्या गेल्या असुन इमारतींची रंगरंगोटी केली गेली आहे. त्यामुळे लांजा येथील मुख्य पोलिस स्थानकाचा कायापालट झाला आहे.
दरम्यान मुल्यांकनासाठी आलेल्या सोलापूर येथील यश कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ओंकार पत्की व त्यांच्या पथकाने स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यानी स्थानकातील एकुणच केले गेलेले बदल पाहुन स्थानकाला आय. एस. ओ दर्जा बहाल केला. यावेळी लांजा पोलिस निरीक्षक विकास गावडे, ईतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.