रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई-गोवा महामार्गावर आज लांजा तालुक्यात विचित्र अपघात घडला. या अपघातात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अमेय वाडकर असे त्याचे नाव आहे. दुचाकीवरून परिक्षेसाठी तो जात होता. याचवेळी रस्त्यात उभ्या असणाऱ्या म्हशीला त्याची धडक बसली आणि तो खाली पडला.
या सुमारास पाठीमागून येणाऱ्या एसटी खाली तो सापडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. प्रतीक हॉटेल समोर ही घटना घडली.
अमेय तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिकत होता. लांजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अमेयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.