मंडणगड : तालुक्यातील दहागाव येथे LBSH माजी विद्यार्थी मंचाच्या वतीने इयत्ता ५ वी ते १० वी वर्गासाठी LED स्मार्ट टीव्ही चे उदघाटन आणि गुणवंतविदयार्थी सोहळा कार्यक्रम शनिवार १३-७-२०१९ रोजी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे पार पडला.
यावेळी अश्विनी मोरे चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) मार्फत ४३ इंच पाच स्मार्ट टीव्ही शाळेला प्रदान करण्यात आले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजी चाऊस डिक्शनरी चे वाटप करून सन २०१८-१९ दहावी परीक्षेत पास होऊन प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मंचातर्फे सन्मानचिन्ह आणिरोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारचे विविध उपक्रम मंचाच्या पटलावर आहेत असे प्रस्तावपर भाषणात मंचाचे सेक्रेटरी दीपक गोरीवले यांनी सांगितले.
शालेय अभ्यासक्रमा मध्ये भविष्यात ई लर्निंग चा वापर मोठ्या प्रमाणत होणार असून त्याचा पुरेपूर फायदा येथील मुलांना कसा घेता येईल यासाठी मंचसर्वोतोपरी प्रयत्न करेल असे मंचाचे अध्यक्ष सुभाष तांबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.
यावेळी मंचाचे उपक्रम आम्ही वेबसाईट, फेकबुक आणि व्हाट्सअप्प इ. सोशल मिडियामाध्यमातून कशाप्रकारे प्रसार करत आहोत याची माहिती माजी सेक्रेटरी सुभाष दळवी यांनी दिली.यावेळी अश्विनी मोरे चॅरिटेबल ट्रस्ट,मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मोरे, सुरेंद्र मोरे, अमेय मोरे उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांच्यासह शिक्षक,कर्मचारी,शालेय कमेटीचे पदाधिकारी हजर होते.
माजी शिक्षक खोचरे, चव्हाण आणि पाटणकर सरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मंचाला प्रोत्साहित केले.
दिलीप मराठे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंचाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सह सेक्रेटरी नरेश चव्हाण तसेच पदाधिकारी मनोज वेदक नंदकुमार दळवी आणि संपूर्ण कार्यकारिणीने मेहनत घेतली. कार्यकारिणी सदस्य संदीप सुखदरे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.