मुंबई, (निसार अली), 31 मे : कोरोना आजाराशी लढताना आपल्या राज्यातील विविध रुग्णालयांतील रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात केवळ ८-१० दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. पुढील धोका ओळखून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जनतेला रक्तदान करण्यासाठी विनंती केली होती व याला सकारात्मक प्रतिसाद देत आज गोरेगाव पूर्व येथील लक्ष्मण नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केल होत. एकूण 104 रक्तदात्यांनी रक्तदान केलं व यावेळी प्रत्येक रक्तदात्याला कोविड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी कै. मीनाताई ठाकरे ब्लड बँक गोरेगाव यांचे तसेच स्थानिक शाखाप्रमुख अजित भोगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले, अशी माहिती मंडळाचे सचिव अनिल दळवी यांनी दिली.विभागातील 19 महिलांनी देखील या कठीण काळात रक्तदान केल्यामुळे त्यांचे खूप कौतुक होत आहे.