रत्नागिरी दि.19:- पोलीस अधीक्षक रत्नागिरी कार्यालयातंर्गत पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील पोलीस दवाखान्यामध्ये लॅब टेक्नीशियन व फिजिओथेरपीस्ट यांची नेमणूक करण्यात येत आहे. सदर पदाकरीता प्रतिमाह आठ हजार रुपये पगार देण्यात येणार असून शैक्षणिक अर्हता फिजिओथेरपीस्ट पदासाठी फिजिओथेरपी विषयासह सरकारमान्य पदविका/पदवी व लॅब टेक्नीशिअन पदासाठी सरकार मान्य पदविका/पदवी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी (लक्षवेध-कल्याण शाखा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, रत्नागिरी 415612 दूरध्वनी क्र. 02352-223533 ईमेल आयडी sp.ratnagiri@gmail.com येथे 24 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावेत, असे पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.