रत्नागिरी, (आरकेजी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या राजापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका कॉन्ट्रॅक्टरचं शेवटचं बील काढण्यासाठी राजापूर तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यानी तीन लाख ऐंशी हजाराची लाच मागीतली होती. या प्रकरणात एकूण पाच जणांचा समावेश होता. दरम्यान कॉन्ट्रॅक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून अधिकाऱ्याना मंगळवारी रंगेहाथ पकडले. यावेळी तिघांना अटक करण्यात आली होती. तर दोघेजण फरार झाले.
कृषी पर्यवेक्षक वैभव मच्छींद्र जाधव, क्षेत्र सल्लागार ओंकार अशोक माळी, राजापूर तालुका कृषी अधिकारी चंद्रमणी अंतुजी मेश्राम यांना अटक करण्यात आली होती. कृषी सहाय्यक राही पांडुरंग जाधव आणि एकात्मीक पाणलोट विकास समिती कारवलीचे अध्यक्ष अशोक वरेकर हे दोघेजण फरार आहेत. पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.