
आठ दिवसात २ कोटी ठेवी जमा ; ग्राहकांचा विश्वास
रत्नागिरी ः कुसुमताई सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासाला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्या आठ दिवसात २ कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. ९ टक्के दराला सर्वाधिक पसंती मिळत आहे, अशी माहिती पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी दिली.
पतसंस्थेच्या ठेव वृद्धी मासामध्ये ५ कोटी ठेवी संकलीत करण्याचा संकल्प संचालक मंडळाने केला असून १ वर्षासाठी ९ टक्के व्याजदर व ३ वर्ष मासिक त्रैमासिक व्याज ८ टक्के व ३ वर्ष पुनर्गुतवणूक ठेव व्याजदर ७.५० टक्के ठेवीदारांना मिळणार आहे. संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संस्थेकडे ५० कोटीच्या ठेवी आज पर्यंत जमा झाल्या आहेत. यंदा ठेव वृद्धी मासात ७५ कोटीचे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वास संचालकांना असून त्या दृष्टीने सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजेंट नियोजन केले आहे. पहिल्या आठ दिवसात २ कोटी ठेवी जमा झाले आहेत. ठेव मासासाठी १ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. नाना शिंदे व उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.
पतसंस्थेमधे सोनेतारण कर्जासह जामीनतारण व वाहनतारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
पतसंस्थेमध्ये दररोज ७ लाख पिग्मी जमा होत असून आर.डी. किंवा बचत खाती च्या माध्यमातून ठेवी जमा होत आहेत. संस्थेवरील विश्वास यामुळे अधिक दृढ होत आहे. सर्वत्र सोनेतारण कर्जाची वाढती मागणी लक्ष्यात घेता गुंतवलेल्या ठेवीचे योग्य नियोजन संस्था स्तरावरून करण्यात येत आहे. संस्थेचे एकूण भाग भांडवल ७७ लाख ६५ हजार ठेवी ५० कोटी, कर्ज ४२ कोटी, नफा ७२ लाख वसुली ९९ टक्के आहे. गेल्यावर्षीपर्यंत ५० कोटीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करताना 100 कोटी जमा करण्याचा संकल्प संचालक मंडळाचा आहे. या सर्व प्रवासात सर्व ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार यांनी मोलाचे सहकार्य केले. पतसंस्थेने विश्वासार्हता जपली आहे.














