रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मार्निंग वॉंकच्यानिमित्ताने शहरालगत असणार्या कुष्ठरोग वसाहतीला भेट देवून तेथे असणार्या समस्या जाणून घेतल्या. तसेच स्वच्छतेविषयी माहिती घेतली.
रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी यांनी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहर पाहण्याचा चंग बांधला असून यानिमित्ताने शहरालगतच्या शिरगाव, एमआयडीसी येथे असणार्या कुष्ठरोग वसाहतीला भेट दिली. तेथील अनेकांशी संवाद साधत त्यांना येणार्या अडीअडचणी समजावून घेताना वृद्ध महिलांना औषधे वेळेवर मिळतात का? त्यांच्या पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. त्यांचे घरे कशाप्रकारची आहेत. सांडपाण्याचा निचरा होतो का आदींसह विविध समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी तेथील अनेकांनी आपल्या इमारती पडायला झाल्याचे स्पष्ट केले. तसेच महिलांना रुग्णांनी मिळणार्या औषधाविषयी समाधान व्यक्त केले. तसच या परिसरात मोठ्या प्रमाणात डांसाचा उपद्रव होत असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे तसेच परिसराची साफसफाई करताना या परिसराला वेढलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली. तसेच मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रला भेट दिली. जिल्हाधिकार्यांनी अचानकपणे सकाळी दिलेल्या भेटीमुळे या परिसराचे वास्तव्य समोर आले. दरवेळी सेटअप करुन वरिष्ठ अधिकार्यांना चांगले दाखवले जायचे त्याला यामुळे लगाम बसला असल्याची चर्चा तेथील जनतेमध्ये सुरु झाली आहे.















