मुंबई : प्रसिद्ध लोकशाहीर कुंदन कांबळे यांचे आज हृद्याच्या तीव्र झटक्याने कन्नमवार नगर येथे निधन झाले. कन्नमवार नगर येथील राहत्या घरी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना हृद्याचा तीव्र झटका आला. त्वरित त्यांना पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली आणि मुलगा असा परिवार आहे. कुंदन कांबळे यांच्यावर उद्या (ता. १) विक्रोळीतील टागोर नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील
कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक १७७ मध्ये कुटूंबासह ते राहत होते. आंबेडकरी चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या भीम-बुद्धगीतांनी, कोळी गीतांनी , लोकगीतांनी महाराष्ट्राला वेड लावले.
प्रतिक्रिया:
त्यांच्या निधनाने आंबेडकरी कला चळवळीची हानी झाली आहे अशी आदरांजली प्रसिद्ध साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांनी वाहिली.
>>>>>