मुंबई : चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे कातळवाडीतील इयत्ता ११ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी सुरज जोयशी याचे अल्पशा आजाराने निधन झाले. दरम्यान, कुणबी समाजाने नवा आदर्श इतर समाजांपुढे ठेवत मृताच्या कुटुंबियांना खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत केली. तसेच सुरजची ४ वर्षाची छोटी बहीण साक्षी हिवा वार्षीक शैक्षणिक खर्च कुणबी युवा उचलणार असल्याचे जाहीर केले. कुणबी युवा चिपळूण तालुकाध्यक्ष भाई कुळे, सचिव गजानन वाघे आणि संघटक मोहन मांडवकर यांनी शुक्रवारी सुरजच्या घरी जाऊन त्याच्या कुटूंबियांचे सांत्वन केले व त्याला आर्थिक मदत केली. यावेळी वाडीतील प्रमुख कार्यकर्ते अनंत कारकर, इतर वाडीतील मंडळी उपस्थित होती.