खेड : कोकणातील आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा अभाव जाणवत आहे. आरोग्य विभागाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी कुणबी युवाने नुकतेच कळंबणी येथे लाक्षणिक उपोषण केले. लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचे काहीही देणेघेणे नाही. परिणामी आरोग्य व्यवस्था धोक्यात आली आहे, असा आरोप कुणबी युवाने यावेळी केला. आरोग्य केंद्र आहेत परंतु, त्यात पुरेसे कर्मचारी वर्ग नाहीत. वैद्यकीय सुविधांचा ही तुटवडा आहे. पुरेसे उपचार न मिळाल्याने रुग्णांना मुंबईत दाखल करावे लागते. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्य होतो, अशी माहिती कुणबी युवाच्यावतीने देण्यात आली. तातडीने हा प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुणबी समाजोन्नती संघ खेड ग्रामीण अध्यक्ष अमित कदम व कुणबी युवा खेडचे युवाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी दिला आहे.