मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ): कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर आणि संलग्न कुणबी युवा यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाज युवक -युवती यांच्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीर रविवार, दि.१३/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता गूरूकूल हॉल,रोड नंबर ६, पार्कसाईट , विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०००७९ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. रोहिदास दुसार ( माजी असिस्टंट पोलीस कमिशनर व उप प्राचार्य ट्रेनिंग शाळा, खंडाळा ),श्री.रमेश घडवले (मा.सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई)उपस्थित रहाणार आहेत. शिवाय श्री. माधवजी कांबळे(अध्यक्ष-मध्यवर्ती कुणबी युवा मंडळ),शाखा पदाधिकारी,महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी, विवाह मंडळ कार्यकारणी, सदस्य आणि सभासद यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.अधिक माहीतीसाठी आजच श्री. सूरेश मांडवकर – 9833667560/ दिलीप कातकर – 8976709815/ मनिष वालम- 9769399296 यांच्यासी संपर्क साधावा.(येणाऱ्या प्रत्येक सदस्यांनी आपण येणार असल्याची नोंद संबंधितांना द्यावी)तरी समाजातील युवक -युवती यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कुणबी युवा विक्रोळी-घाटकोपर प्रचार-प्रसार टिमने केले आहे.