घाटकोपर (एस.एल.गुडेकर): कुणबी समाजोन्नती संघाच्या मुंबई विभागीय शाखेअंतर्गत विक्रोळी-घाटकोपर संलग्न कुणबी युवक मंडळाच्यावतीने दिनदर्शिका २०१८ चे प्रकाशन करण्यात आले. विक्रोळी पार्कसाईड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी कृष्णा सुर्वे, शांत्ताराम गुडेकर, शाखाध्यक्ष सोनू शिवगण, प्रकाश वालम, आत्माराम बाईत, दत्ताराम रामाने, सुरेश मांडवकर, दत्ताजी आग्रे, सुमित धोंडगे, प्रतिक मिसाळ, राज घरत, विश्वनाथ कुल्ये, कैलास शिंदे, प्रसन्ना खोल्ये, गणेश दवंडे यांच्यासह समाजोन्नती संघाचे अनेक पदाधिकारी, सदस्य, सभासद व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. समाजातील जागृत वृत्तपत्रलेखक मुक्त पत्रकार केतन भोज, वैद्यकिय क्षेत्रातील अनंत कदम यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कुणबी युवक मंडळ, मुंबई निर्मित कुणबी युवा कलामंच, मुंबई प्रस्तुत सम्राट बळीराजा, शोध संस्कृतीचा सत्य इतिहासाचा या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. समाजाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी युवाशक्तीला समाजाच्या प्रवाहात ओढण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.