ठाणे : [ विशाल मोरे यांसकडून] : विखुरलेल्या समाजाचे मजबूत संघटन व सक्षमीकरण तसेच स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांवर आधारित समाजाची नवनिर्मिती करण्यासाठी व ती समाजात खोलवर रुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्यामधील प्रती कोकणं म्हणून ओळखले जाणारे दिवा शहरात वास्तव्यास असणारे कोकणवासीय कुणबी बांधव एकवटले असून उपरोक्त संघटनेच्या माध्यमातून प्रथमच रविवार,दि.१७ जुलै २०२२ रोजी,भोई समाज हॉल दिवा याठिकाणी भव्य दिव्य विद्यार्थी गुणगौरव, करिअर मार्गदर्शन व समाज जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवा शहरात कुणबी बांधवांचे संघटिकरण व्हावे यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा ता.दापोली मा.अध्यक्ष शरद भावे व समाज कार्यकर्ते दत्ताराम करबेले यांनी संकल्पना मांडली व दिव्यातील काही कुणबी बांधवांनी ती प्रत्यक्ष आमलात आणली. उपरोक्त संघटना आगामी काळात विविध समाजपयोगी उपक्रम राबवून समाज संघटन व जनजागृती करणार आहे यासाठी शहरातील सर्व कुणबी बांधवांनी उपरोक्त संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअर मार्गदर्शन करण्यासाठी मिलिंदजी कडवईकर सर (शिक्षक समुपदेशक,संगमेश्वर ) तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अविनाश लाड (मा.उपमहापौर नवी मुंबई),दशरथ पाटील (अध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका दापोली मुंबई), रविंद्रजी मटकर (मा.अध्यक्ष अखिल कुणबी सेवा संघ ),प्रभाकर धनावडे (संघ प्रतिनिधी संगमेश्वर ),विजय नायनाक (समाजसेवक ),कल्पेश शितप (समाजसेवक व युवा उद्योजक),प्रविण ऊतेकर (कोकण विकास प्रतिष्ठान सचिव ) आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
संघटनेचे प्रभारी अध्यक्ष शांताराम कांगणे,गणेश दवंडे,प्रशांत कदम,सुरेश शिगवण,दिलिप शिगवण,बबन सकपाळ, सुनील आग्रे, भरत माटल,नितीन दवंडे,राजेश चिनकटे,जितेंद्र लोखंडे,मोहन म्हाप्रले, महेंद्र घडशी,निलेश कराडे,सुरेश दवंडे, सुरेश शिंदे आदींनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल मोरे व गणेश दवंडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.