
मुंबई (शांताराम गुडेकर) : कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई)शाखा तालुका – दापोली,गट -पालगड (ग्रामीण)/मुंबई)तर्फे कुणबी दिनदर्शिका – २०२२ चे प्रकाशन व वितरण सोहळा शिरसाडी – विट्ठल रखुमाई मंदिर येथे अध्यक्ष मा.श्री.शरद भावेसाहेब, मा. श्री.संदीपजी राजपुरेसाहेब,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-श्री. विष्णू डिकेसाहेब व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे श्री.संदीप राजपुरे साहेब – सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश,श्री. शरद भावे साहेब – अध्यक्ष – कुणबी समजुन्नती संघ – दापोली तालुका -पालगड (मुंबई), श्री. दिपक गोरीवले साहेब – माजी ग्रामीण अध्यक्ष – कुणबी समजुन्नती संघ – दापोली, श्री.विष्णू डिके साहेब – संस्थापक अध्यक्ष – पालगड गट मुंबई,श्री.किशोर चौगुले साहेब – कार्याध्यक्ष – पालगड गट – ग्रामीण,श्री. महेंद्र चव्हाण साहेब – सचिव – पालगड गट ग्रामीण,श्री.केशव भुवड साहेब – माजी पोलीस पाटील – शिरसाडी, श्री.दत्ताराम ठोंबरे साहेब, उपाध्यक्ष – पालगड गट मुंबई, श्री. नारायण काटकर साहेब , उपाध्यक्ष पालगड गट मुंबई, श्री.संदीप कदम साहेब , खजिनदार पालगड गट मुंबई, सहसचिव – श्री.अनुज चव्हाण – पालगड गट मुंबई,सौ.दिपली भुवड – अध्यक्ष महिला मंडळ , शिरसाडी आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे पालगड गट कमिटी – मुंबई ने आभार व्यक्त करत दिनदर्शिका प्रकाशन व वितरण कार्यक्रम सोहळ्याची सांगता केली.