रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): कुंभार्ली घाटात रुंदीकरण होणार नसेल तर गुहागर – चिपळूण बाजारपेठेत रुंदीकरणाची काय आवश्यकता आहे, लोकांना विश्वासात घेतले जात नाही, कोणतेही प्लान नाही डिझाइन नाही, फक्त यांच्या अधिकारी यांच्या साठी अंदाजपत्रक आहे का ? असा सवाल उपस्थित करून रस्त्यालगत बाधित लोकांना व त्या त्या गावातील ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊनच कामाला सुरूवात करावी, जोपर्यंत विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असा सणसणीत इशारा चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी शिरगाव ग्रामपंचायत बैठकीत दिला आहे.
गुहागर-विजापूर रस्ता तीनपदरीकरण होत असून त्याबाबत नुकतीच शिरगाव ग्रामपंचायतमध्ये जनसेवा संघाच्या माध्यमातून एक संयुक्त बेठक पार पडली. या बेठकीला माजी सभापती शौकत मुकादम यांनी मार्गदर्शन केले. गुहागर- विजापुर या मार्गासाठी काही वर्षांपूर्वी जमिनीं संपादीत करण्यात आल्या त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे पूर्वीचा व आताच मोबदला लोकांना देण्यात यावा. 80 टक्के बधितांना मोबदला दिल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही असे शासन धोरण आहे, परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लोकांची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत मात्र लोकांना विश्वासात घेऊनच काम करावें तोपर्यंत काम सुरू करू नये असा इशारा देत कोल्हापूर व चिपळूण येथील अधीकारी यांच्या बेठकीत नेमकं काय घडले आणि काय माहिती दिली गेली याचे सखोल मार्गदर्शन शौकत मुकादम यांनी यावेळी केले.
तसेच शिरगाव येथील संघर्ष समिती गावापुरती मर्यादित असून त्यामध्ये परिसरातील इतर गावाचा समावेश करण्यात यावा. त्यामध्ये खेर्डी पासून पोफळी पर्यंत गावचे सरपंच व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य याना घेण्यात आले तसेच रस्तालगत बधितांचा समावेश त्या समितीमध्ये करण्यात आला. तसेच लवकरच त्या समितीच्या माध्यमातून उपविभागीय आधीकारी याची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी शिरगाव पंचक्रोशीतील 200 हुन अधिक नागरिक उपस्थित होते.