रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 द्वारा क्षेत्रीय स्तरावरील 49 वी डाक अदालत 23 सप्टेंबर 2021 रोजी 11.00 वाजता माननीय पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालयामध्ये आयोजित केली आहे.
पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बैंक मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. तक्रारींचा उल्लेख तारीख व ज्या अधिकान्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, पत्ता इत्यादी सर्व तपशीलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार रमेश प्रभू, सेक्रेटरी डाक अदालत व सहाय्यक डाक निदेशक, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 यांचे नवे अतिरिक्त प्रतिसह 13 सप्टेंबर 2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावे. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे सहायक डाक निदेश गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांनी कळविले आहे.