रत्नागिरी दि. ७ : तालुकास्तरावरील गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषि निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहिम राबविण्याकरिता कृषि आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयातील एकूण 9 तालुक्यांमध्ये सन 2021-2022 साठी भरारी पथकांची स्थापना करण्यात येत आहे.
या भरारी पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (संबधित तालुका) हे पथक प्रमुख, कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, निरिक्षक वजनमापे (संबधित कार्यक्षेत्र), मंडळ कृषि अधिकारी (संबधित कार्यक्षेत्र) हे सदस्य असतील तर कृषी अधिकारी (गुणनियंत्रण निरिक्षक), पंचायत समिती संबधित तालुका हे सदस्य सचिव असतील असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.