
खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन
चिपळूण : वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२६ या महोत्सवाचे उद्घाटन आज सकाळी ११.३० वाजता माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या उदघाटन सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत, दुग्ध विकास मंत्री ना. अतुल सावे, मत्स्य व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री ना. भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा उद्घाटन सोहळा चिपळूण नगर परिषदेचे स्वा. वि. दा. सावरकर मैदान बहादुरशेख नाका, चिपळूण येथे होणार आहे.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे सलग तिसऱ्या वर्षी वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२६ महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी शानदार उद्घाटन सोहळा होईल. यावेळी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य महासंघ मर्या महानंदचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे मान्यवर देखील उपस्थित असणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यापूर्वी भाजप नेते तथा वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर शुक्रवार दिनांक ९ जानेवारी पर्यंत कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.














