कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि कार्यकर्ते, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले(वय -६३) यांची कोल्हापूरमधील त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही हत्या क्षुल्लक कारणातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रीतम गणपती पाटील (वय ३०, रा. राजेंद्रनगर) याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
किरवले हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले.