मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतील सध्या रोजंदारीवर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशीमाहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.
जानेवारी 2014 मध्ये घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील कृषी सहाय्यक या पदाच्या नेमणूकी मध्ये कोणतीही अनियमितता झालेली नसून, यासंदर्भात आलेल्या तक्रारीच्या कुलगुरुयांच्या मान्यतेने चौकशी समिती नेमन्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार या तक्रारीत काही तथ्य नाही असे स्पष्ट झाले आहे, असेही फुंडकर यांनी सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.