‘कृष–ई चॅम्पियन’ या ‘महिंद्रा’च्या पुरस्काराच्या माध्यमातून व्यक्ती व संस्था यांचा शेती व तत्संबंधित सेवांच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान
- पुरस्कार सुरू करण्याच्या सोहळ्यातच 10 राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
मुंबई, 3 फेब्रुवारी : ‘महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टर’ हा भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर निर्माता आणि 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहाचा एक भाग आहे. महिंद्रा उद्योगसमुहाने ‘कृष-ई चॅम्पियन’ पुरस्कार 2020 सुरू करीत असल्याची घोषणा दि. 30 जानेवारी 2021 रोजी केली, तसेच हे पुरस्कार प्रथमच मिळवलेल्या विजेत्यांची नावेही घोषित केली. 2011 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘महिंद्रा समृद्धी इंडिया अॅग्री अॅवॉर्ड्स’ची (एमएसआयएए) परंपरा पुढे नेत, ‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ यंदा सादर करण्यात आले. या पहिल्याच वर्षी राष्ट्रीय स्तरावर 4 विभागांत 10 जणांना ‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ देण्यात आले.
‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ वितरण सोहळा वर्षातून दोनदा, खरीप व रब्बी हंगामांच्या काळात, आयोजित केला जाणार आहे. सामान्यतेतून असामान्य कामगिरी करणाऱ्या, कोणतीही मर्यादा न स्वीकारता नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करीत, कृषी क्षेत्रात सकारात्मक कामगिरी करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना वैयकतिकरित्या व संस्थांनाही या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. ‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’च्या माध्यमातून लाखो शेतकरी बांधव आणि कृषीप्रेमींना देशाचा भविष्यकाळ निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे, हे ‘महिंद्रा’चे उद्दिष्ट आहे.
‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ 2020च्या प्रादेशिक फेरीत भारताच्या 29 ‘कृष-ई’ केंद्रांमधील शेतकर्यांनी भाग घेतला. राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या या प्रादेशिक पुरस्कार विजेत्यांना चार विभागांमध्ये सन्मानित करण्यात आले. ‘तकनीक चॅम्पियन’, ‘महिला किसान चॅम्पियन’, ‘युवा किसान चॅम्पियन’ आणि ‘रेंटल पार्टनर चॅम्पियन’ असे या पुरस्काराचे विभाग आहेत.
यावेळी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’च्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’चे प्रेसिडेंट हेमंत सिक्का म्हणाले, “मूलभूत पातळीवर बदल करणार्यांचा सत्कार करण्यासाठी आणि यापूर्वीच्या ‘समृद्धी अॅवॉर्ड्स’च्या यशाची दृढ परंपरा पुढे नेण्याच्या हेतूने, ‘कृष-ई चॅम्पियन अॅवॉर्ड्स’ सुरू करून, त्यांचे वितरण करण्यात आम्हाला मोठाच आनंद आहे. शेतकऱी बांधवांचा गौरव करण्याची आमची दशकभराची परंपरा लक्षात घेऊन त्या धर्तीवर हे नवीन पुरस्कार आम्ही सुरू केले आहेत. आम्हाला विश्वास आहे, की या पुरस्कारांमधून उद्याच्या चॅम्पियन शेतकऱी बांधवांना प्रेरणा मिळेल व भारताच्या कृषी क्षेत्रात बदल होण्याची गती आणखी वाढेल.”
‘महिंद्रा अँड महिंद्रा लि.’चे एफईएस स्ट्रॅटेजी व एफएएएस यांचे वरिष्ठ उपाध्यक्ष रमेश रामचंद्रन म्हणाले, “कृषी उत्पादन वाढण्यासाठी विविध सेवा पुरविण्याच्या उद्देशाने आम्ही ‘कृष-ई’ हा ब्रॅंड सादर केला आहे. या सेवांमधून कृषीशास्त्र, यांत्रिकीकरण व डिजिटायझेशन यांचे लाभ शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. आतापर्यंत ‘कृष-ई’मुळे हजारो शेतकऱ्यांच्या उत्पादनात 15 टक्क्यांपर्यंतची वाढ झाल्याचे दिसून आले आहे, त्यांचा शेतीचा खर्च 8 ते 12 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि नफ्यात एकरी 6 हजार रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. ज्या प्रगतीशील शेतकऱी बांधवांनी पुढे जाण्याकरीता व उत्पादन वाढीकरीता नवीन पद्धतींचा स्वीकार केला, त्यांची उत्कटता यातून दिसून येते. आमच्या बरोबरीने अत्यंत महत्त्वाचे हे पाऊल उचलणाऱ्या शेतकऱी बांधवांची प्रगती साजरी करण्यासाठी ‘कृष-ई चॅम्पियन’ पुरस्कारांचे प्रयोजन करण्यात आले आहे.”
‘‘एक्सपर्ट तंत्र, नवीन उपाय, परिणाम दर्शविते’’, असे घोषवाक्य असणाऱा ‘कृष-ई’ हा ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’चा ‘फार्मिंग अॅज अ सर्व्हिस’ (FaaS / एफएएस) स्वरुपाचा व्यवसाय विभाग आहे. ‘कृष-ई’ हे तंत्रज्ञान आधारित सेवा पुरविते, जे पुरोगामी, परवडणारे आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. पिकांच्या संपूर्ण हंगामात डिजिटल सेवा देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे ‘कृष-ई’चे उद्दिष्ट आहे. या सेवांमध्ये कृषीशास्त्रविषयक सल्ला, प्रगत कृषी उपकरणे भाडेतत्वावर देणे आणि नवीन युगातील शेतीतील अचूक उपाययोजनांचा समावेश आहे. शेतीतील एकंदरीत खर्च कमी करणे, पिकांचे उत्पादन वाढवणे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे यावरती लक्ष केंद्रित केले आहे.
‘महिंद्रा’च्या अनेक वितरकांकडे ‘कृष-ई’ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यायोगे वैज्ञानिक पद्धती, माती परीक्षण सुविधा, प्रात्यक्षिक सुरू असलेले प्लॉट्स, उपकरणे भाड्याने देण्याची सोय, ‘प्रीसिजन फार्मिंग’ची सोल्युशन्स, बियाणे व रसायनांसारख्या पीक-साधनांची विक्री, ठिबक सिंचन उपकरणे, तसेच ट्रॅक्टर, कापणीची यंत्रे व इतर कृषी यंत्रांची विक्री व दुरुस्ती यांसारख्या सुलभ सेवा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.