
मुंबई : क्रीडा विश्वात कायद्याच्या ज्ञानाचे प्रबोधन सोप्या पद्धतीने करणे महत्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स व पीस सल्लागार ऍड. राजाराम दळवी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व अध्यक्ष मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ऍड. किशोर शिंदे व राज्यचिटणीस मोहनसिंह चौहान आदी मान्यवरांची भेट मुंबईतील मातोश्री टॉवर,राजगड मनसे मध्यवर्ती कार्यालय शिवाजी पार्क येथे दळवी यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील अनेक नागरिक हे कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहेत. मानसिक आरोग्य कायदा, ड्रग्स विरोधी कायदा व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा व इतरत्र महिला विषयक कायदे व अधिकार समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.सामाजिक न्यायाचा प्रसार व कायद्याच्या ज्ञानाचे प्रबोधन सोप्या पद्धतीने खेळांमार्फतही केली जाऊ शकते, असे दळवी यावेळी म्हणाले.
सामाजिक संबंध मजबूत करण्यासाठी व सलोखा राखण्यासाठी खेळ हे शक्तिशाली माध्यम आहे. महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृती पुनर्जीवीत झाली की चॅम्पियन्स आपोआप तयार होतील. मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती हा जीवनशैलीचा भाग होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. मनसे नेते मंडळीने आपला बहुमूल्य वेळ ऍड. राजाराम दळवी यांना दिला व मनसे महाराष्ट्राच्या समाज कल्याण उपक्रमांना नेहमी चालना देते.सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले.















