मुंबई : विक्रोळीतील क्रांतीवीर ज्योतीबा फुले रुग्णालय बचाव समितीच्या 12 सप्टेंबरच्या बेमुदत साखळी उपोषणाला जनता दल सेक्युलरने जाहीर पाठींबा दर्शविला आहे. पक्षाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांनी ही माहिती दिली.
विक्रोळी कन्नमवार नगर येथे महापालिकेचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे अनेक विभाग बंद आहेत. हे रुग्णालय वाचावे यासाठी क्रांतीवीर ज्योतीबा फुले रुग्णालय बचाव समिती स्थापन झाली आहे. समिती 12 सप्टेंबरला बेमुदत साखळी उपोषण करणार आहे. या उपोषणाला जनता दलाने पाठींबा दर्शवला आहे.
दरम्यान, रुग्णालय स्थापनेपासून तेथे समस्या आहेत. सदर रुग्णालय पूर्ववत सुरू होणे आवश्यक आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असे रुग्णालय सामान्य नागरिकांना मिळाले पाहिजे, असे प्रभाकर नारकर आणि सदानंदन यांनी सांगितले.