विक्रोळी : ” समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली” असा जयघोष करत आज विक्रोळी कन्नमवार नगरातील उत्कर्ष बाल मंदिर या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष बाल मंदिर येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक इयत्तेमधून नंबर काढून १ ते ३ क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. त्याप्रसंगी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष आशिष कांबळे, सचिन लोहेरा, सोनू पथारिया, गौरव खदियार, सूरज गायकवाड, शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन राहुल वाघधरे यांनी केले.
“नवीन वर्षातला पहिला उत्सव म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली. भारताच्या प्रथम महिला शिक्षिका ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवत देशभरातील महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट उगविली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,” असे प्रतिपादन राहुल वाघधरे यांनी केले.