
नवी मुंबई : कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या सुमारे 52 हजार 577 मजूरांच्या निवाऱ्याची व जेवणाची व्यवस्था 569 मदत शिबीर (Relief Camp) शासनामार्फत व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने केली आहे. अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने 19 मार्च रोजी लॉकडाऊन जाहिर केला. त्या दिवसापासून एसटी, रेल्वे सारख्या सार्वजनिक दळणवळणाच्या सेवा बंद झाल्या. केंद्र सरकारने देखील 22 मार्च पासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर संपूर्ण देशातील रेल्वे व इतर सार्वजनिक दळणवळणाच्या सेवांना परवानगी नाकारली. त्यात अडकलेले एकूण 52 हजार 577 परराज्यातील कामगार कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये अडकले. या मजूरांना राहण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण 569 मदत शिबीर (Relief Camp) तयार करण्यात आले आहेत. त्यांची जिल्हानिहाय आकडेवारी अशी ठाणे-144, पालघर-34, रायगड-327, रत्नागिरी-55 आणि सिंधुदूर्ग-9 या प्रमाणे या सर्व मजूरांना एकवेळचा नाश्ता व दोन वेळच्या जेवणासह औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.
या मजूरांव्यतीरीक्त विभागातील एकूण 61 हजार 63 मजूर व गोरगरीबांना एक वेळचा नाश्ता व दोन वेळचे जेवण प्रशासन देत आहे. तसेच काही सामाजिक संस्था स्थानिक नागरिकांमार्फत गरजू व्यक्तींना मदत केली जात आहे.
कोकण विभागात 95 अलगीकरण व 178 विलगीकरण कक्ष सज्ज
कारोना विषाणूचा प्रदूर्भाव पूढील काही दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनामार्फत विविध उपायोजना करण्यात येत आहेत. कोरोना बाधीत किंवा संशयीत रुग्णांचे अलगीकरण (आयसोलेशन) करण्यासाठी कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील एकूण 95 हॉस्पिटलांना अलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) व 178 विलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) म्हणून घोषित करण्यात आले आहे. इस्पीतळांमधील वैद्यकीय व्यवस्था WHO (World Health Organisation) कडून ICMR (Indian Council of Medical Research) ला देण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचीत प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमधील बेडची संख्या, ऑक्सीजन व्यवस्था व व्हेंटिलेटर्सची संख्या या मार्गदर्शन सूचित दिल्या नूसार तपासण्यात आलेली आहे. या अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 5 हजार 981 रुग्णांच्या अलगीकरणाची क्षमता आहे तर विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 8 हजार 318 रुग्णांच्या विलगीकरणाची क्षमता आहे. आतापर्यंत विविध अलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 2 हजार 275 रुग्णांच्या अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण 854 रुग्णांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोकण विभागात आतापर्यंत फक्त 32 रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. पुढील दिवसांत व्हेंटिलेटरची आवश्यकता वाढल्यास तसे पुरेसे व्हेंटिलेटरर्स तयार आहेत. अशी माहिती दौंड यांनी दिली.
आवश्यकत्या ठिकाणी खाजगी वैद्यकीय अधिकारी तपासणीसाठी तात्पुरत्या स्वरुपात महानगरपालिका स्तरावर नियुक्त करण्यात आले आहेत.















