रत्नागिरी : गुहागर तळवली भडखंबा-वडद सया भोईवाडी येथील रस्ता गेली अनेक वर्षे प्रलंबित होता, येथील जनतेची निकड लक्षात घेऊन या रस्ताचे भूमिपुजन होत आहे. कोकण सुखी आणि समृध्द झाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण नेहमीच प्रयत्नशील असतो. या रस्त्याचे काम चांगल्या तऱ्हेने झाले पाहिजे, रस्ता चांगला टिकला पाहिजे यासाठी आपण रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणे गरेजेच आहे असे राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर म्हणाले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गुहागर तालुकातील तळवली भडखंबा-वडद सया भोईवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे युवानेते अदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते वडद, गुहागर येथे भुमिपुजन झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवानेते आदित्य ठाकरे, योगेश कदम, सचिन कदम तसेच विविध विभागाचे अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले गुहागर तालुकातील तळवली भडखंबा-वडद सया भोईवाडीकड जाणाऱ्या रस्ता दर्जोन्नती करण्यासाठी ३ कोटी ५४ लाख एवढा खर्च येणार असून सदर काम ९ महिन्यात पूर्ण होण अपेक्षित आहे. सदर रस्त्याची लांबी ९ किमी असणार आहे, रस्तामध्ये मोऱ्या, आवश्यक तेथे संरक्षक भिंत इ. अशा गोष्टी असणार आहेत.
तत्पुर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील मांजरे कोंढार चिवेली या रस्त्याचे, अकले चोरगेवाडी – जुनावाडा रस्त्याचे भूमिपुजन ही युवानेत अदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते झाले. अकले चोरगेवाडी – जुनावाडा या रस्त्यासाठी अंदाजे 1 कोटी 93 लाख एवढा प्रत्यक्ष खर्च येणार असून रस्त्याची लांबी 5 .5 किमी असणार आहे. तसेच मांजरे कोंढार चिवेली या रस्त्यासाठी अंदाजे 4 कोटी 63 लाख एवढा होणार असून रस्त्याची लांबी 10 किमी असणार आहे.