आरामदायी प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्माण केलेली रेल्वे
रत्नागिरी, प्रतिनिधी : प्रवाशांच्या या आवडीला डोळ्यासमोर ठेवून कोकण रेल्वेने ‘विस्टा डॅम’ कोच सेवा ही वेगळी रेल्वे तयार केली आहे. हि रेल्वेगाडी आज गुरुवारी कोकण रेल्वे मार्गवरून प्रथमच धावली. जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेत जोडलेल्या स्पेशल बोगीला प्रशस्त काचा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे ट्रेनच्या खुर्चीत बसून एक वाईड व्ह्यू अनुभवता येतो. मोठमोठ्या खिडक्या बरोबरच बोगीत प्रशस्थ जागा आहे. यातील खुर्च्या मागे पुढे होतातच, पण गोल ही फिरतात. यामुळे प्रवासी आपल्याला हव्या तशा खुर्च्या ऍडजस्ट करू शकता. यास्पेशल बोगीत फ्रीज डीप फ्रीज बरोबरच ओव्हन व अन्य सुविधा आहेत . सर्व सोयी सुविधां असणारी ही रेल्वे पर्यटक प्रवाशांना सुखावणारी आहे. याच विस्टा डॅम रेल्वे चा पहिला प्रवास आज गुरुवारी 10 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावरून झाला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यादिवशी सकाळी या स्पेशल रेल्वे चे आगमन झालेले होते, 10 मिनिटे थांबा घेऊन हि रेल्वे पुढील प्रवासाला मार्गस्थ झाली
या बोगीचे छप्पर ही काचेचे असून बोगी च्या मागील बाजूचे दालन विशेष आहे. यात उभे राहून मोठ्या काचेतून आपण कोकणचा निसर्ग अनुभवू शकतो. या रेल्वे सेवेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.