रत्नागिरी : मुंबईहून कोकणात येणाऱ्या चकरमन्यांसाठी खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी स्पेशल नव्या 12 गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.कामानिमित्त अनेक कोकणी लोकं मुंबईत वास्तव्यास आहेत. मात्र प्रत्येक सणाला कोकणी माणूस आपल्या गावी येत असतो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी अनेक जण कोकणाची वाट धरतात. शाळा , महाविद्यालयांना सुट्टी असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे परतत असतात..त्यामुळे एस टी बस, खासगी बस, रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असतात. त्यातच आरक्षण तिकीट नसेल तर आयत्यावेळी निघालेल्या अनेकांची गैरसोय होते. त्यामुळेच कोकण रेल्वे प्रशासनाकडून ज्यादा गाड्या सोडण्यात येतात. यावर्षीही 12 गाड्या सोडण्यात आल्या आहेत.यंदा उन्हाळी हंगामासाठी मध्य रेल्वे व कोकण रेल्वे प्रशासनाने तब्बल 144 उन्हाळी स्पेशल गाडी चालवण्याचं जाहीर केलंय.या विशेष गाड्या 10 जून पर्यंत धावणार आहेत..तर आज पासून एलटीटी करमाळी, अंजणी- करमाळी , एलटीटी- सावंतवाडी , सीएसटी करमाळी अशा 12 गाड्या आजपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणारेयत..या जादा गाड्यामुळे चाकरमान्यांची चिंता थोडीफार मिटू शकते.