रत्नागिरी : तब्बल 26 तासानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली आणि मांडवी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना झाली. नातूनगर बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कालपासून कोकण रेल्वे ठप्प झाली होती.
दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले आणि ट्रॅक फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतर रेल्वे सुरू करण्यात आली. लवकरच कोकण रेल्वे पूर्ववत सुरू होईल.
तळकोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वे बसला. परिणामी रेल्वे वाहतूक बंद झाली. कोकण रेल्वेने शर्थीचे प्रयत्न करून रेल्वे सुरू करण्यास यश मिळवले.