रत्नागिरी,(विशेष प्रतिनिधी) : कोकण रेल्वेची भरती प्रकिया यापुढे आता अधिक पारदर्शक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासानाने एक पाऊस पुढे टाकले आहे. कोकण रेल्वेच्या सर्व भरती प्रकिया यापुढे आॅनलाईन पद्धतीने केल्या जाणार असल्याची माहिती, कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी दिली.
एकीकडे कोकण रेल्वेत नोकऱ्यांसाठी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याची ओरड होत आहे. परंतू हे विधान खोडून काढत उलट कोकण रेल्वेतील निम्म्याहून अधिक कर्मचारी प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य कार्मिक अधिकारी (प्रशासन) नंदू तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान येत्या एप्रिलपासूनच्या कोकण रेल्वेच्या सर्वभरती आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. कोकण रेल्वेत आत्तापर्यत ५३ टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतल्याचा दावा कोकण रेल्वेनी केलाय. कोकण रेल्वेची भरती प्रकिया पारदर्शक नसल्याचा आरोप कोकण रेल्वेवर झाला होता. त्यामुळेच कोकण रेल्वेनी पत्रकार परिषदे घेत भरती प्रकियेची माहिती दिली. दोन महिन्यात कोकण रेल्वेच्या भरती प्रकियेत याचा अललंब केला जाणार आहे. तसेच कोकण रेल्वेच्या लखी परिक्षेतील गुण कोकण रेल्वेच्या माध्यमातून जाहिर केले जाणार आहेत. डिसेंबर २०१७ पर्यंत कोकण रेल्वेत ५ हजार १९५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. एकूण कर्मचाऱ्यांपैकी २ हजार ८०३ प्रकल्पग्रस्त आहेत. त्यापैकी ५३ टक्के महाराष्ट्रातील, ३६ टक्के कर्नाटक, तर ११ टक्के गोवा राज्यातील आहेत. या आकडेवारीवरून कोकण रेल्वेने नोकरीमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे तेलंग यांनी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांमधून कुशल कामगार मिळत नाहीत. त्यामुळे सुपरवायझर आणि एक्झीक्युटीव्ह या पदांवर प्रकल्पग्रस्त नेमले जात नाहीत. प्राथमिक परीक्षेत प्रकल्पग्रस्त उत्तीर्ण होतात. परंतू सहाय्यक लोकोपायलट आणि सहाय्यक स्टेशन मास्तर या पदांसाठी होणाऱ्या पुढील परीक्षेत ते अपयशी ठरतात. मात्र प्रकल्पग्रस्तांसाठी या परीक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी करून घेण्यात येते,असेही तेलंग यांनी सांगितले.